[PR] Gain and Get More Likes and Followers on Instagram.

#marathiwriting

78 posts

TOP POSTS

#तारा

या आठवड्यात थंडी थोडी जास्तच आहे, रोज सकाळी सकाळी अंथरुणात साखरझोपेत असताना या थंडीबरोबर मधेच कुठून तरी हळूच मनात एक ऊब जाणवते,✨
उठून खिडकीशेजारी, गार हवा आणि मस्त गरमागरम चहा पित बसल्यावर ध्रुवला त्याची तारा आठवते !💭
.
त्या उगवत्या सूर्याची कोवळी तांबूस किरणं अंगावर झेलताना प्रत्येक किरणात असा एक नाजूक स्पर्श भासतो,💫
जवळ तर कोणीच नसतं पण एकटाच मी वेडा रोज त्या कोवळ्या स्पर्शाने का कुणास ठाऊक आपसूकच हासतो☺
.
वाऱ्याच्या प्रत्येक झुळुके बरोबर मग आम्ही बंजारे होऊन वाट फुटेल तिकडे बागडतो,🍃🦋
ती बरोबर असताना क्षणोक्षणी मनाला एक वेगळाच शहारा जाणवतो!🤗
.
चिमण्यांच्या किलबिलाटाच्या चालीवर जेव्हा तारा गाऊ लागते, 🎻
अंथरुणात बसल्या बसल्या रोज मला परत एक साखरझोप देऊन जाते...😍😴😍 #थोडंसंतिच्याबद्दल

... 🌛🌠🌬
.
.
.
.
.
#ashwinstagram

MOST RECENT

गणेशोत्सव मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आतुरता असते ती तुझ्या आगमनाची.... जसजसा आगमनाचा दिवस जवळ येत असतो तसतशी कामाची लगबग सुरु होते कार्यक्रमांची
रुपरेषा, देखावे, वर्गणी साऱ्याचीच तयारी सुरु होते, तुझे नवीन रुप तर तुच ठरवलेले असतेस रे आम्ही फक्त नावाला ते बघण्यासाठी चित्र शाळेत जातो
बघता बघता काही दिवसांवरुन अवघे ३ तास बाकी असतात तुझ्या आगमनाला प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात उत्साह असतो आणि एक वेगळाच आनंद असतो चेहऱ्यावर तु येण्याचा.... पुढचे ११ दिवस मंडळाच्या कार्यकर्त्याच घर म्हणजे तुझ मंडप, ना तहान भुक ना डोळ्यावर झोप, फक्त माझ्या बाप्पाच्या पाहुणचारात काही कमी नाही राहीली पाहिजे यातच मग्न असतो तो... आपल्या उत्सवाचा इतर कोणाला त्रास होऊ नये ही मनात एक इच्छा... तुझ्या येण्याने सगळी टेंशनस् विसरलेल्या तुझ्या त्या भक्ताला ११ दिवस कधी निघुन जातात ते कळत सुध्दा नाही रे आणि मग वेळ येते ती तुला म्हणजे माझ्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची.... आगमन मिरवणुकीत जल्लोषात उत्साहात नाचणारा तुझा कार्यकर्ता शेवटच्या दिवशी पण तेवढ्याच उत्साहाने तुझ्या विसर्जन मिरवणुकीची तयारी करत असतो, तितक्याच किंबहूना त्यापेक्षा जास्त आनंदाने तुझी ट्रोली तो सजवत असतो..... त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असला तरी मनात मात्र घालमेल सुरु असते तुझ्या रुपाला मन भरेस्तोवर पहायच असत, मनात साठवून घ्यायच असत त्याला तुझ ते रुप....
पाहता पाहता मिरवणूक सुरु होते आणि शेवटी काहीही केले तरी तुझ्या विसर्जनाची वेळ येतेच... तुझ विसर्जन होत असताना तुझी मूर्ती पूर्णपणे दिसेनाशी होत नाही तो पर्यंत त्याचा पाय तिथून निघत नसतो आणि डोळ्यातले पाणी काही थांबत नसत रे
छोट्यांपासुन मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावणारा तु आता निरोप घेत असतोस, पुढच्या वर्षी लवकर येण्याचा आशवासन देउन तु आपल्या गावी निघून जातोस रे ..... पण तुला निरोप देउन परत येताना मात्र तु नसलेला पाट जरा अधिकच जड वाटत असतो, घरी आल्यावर तु नसलेल्या तुझ्या त्या रिकाम्या मंडपाकडे बघुन मन फार उदास होत माझ्यातलच काहीतरी हरवल अस वाटत असत आणि मग त्या ३०-३५ दिवसांचा फ्लॅशबॅक डोळ्यासमोर येतो आणि नकळतच पुन्हा डोळ्यात पाणी येत रे.....
🙏🙏🙏 #shabd_sparsh#marathiwriting#writerscommunity#mimarathi#marathilekh#festival#maharastracultur#mumbaichaganesh#bappamajha05

मला पावसाळा आवडायचा, खूप आवडायचा !
🌦🌈🍃
थोडंसं ऊन पडलेलं असताना आणि थोड्याश्या सरी रिमझिम बरसत असताना ते इंद्रधनुष्य पडलं की त्याचा एक रंग दुसऱ्यात कसा एकरूप झालाय हे पहायला आवडायचं मला! तो मातीचा खरपूस वास नाकात साठवून ठेवून लागेल तसं चवीचवीने घ्यायला आवडायचं मला.
⚡⚡⚡
पण यावेळी काय झालं माहित नाही. सप्तरंग नाही फक्त काळ कुट्ट अंधार पसरलाय सगळीकडं ! ढग गडगडत होते न माझी धडधड वाढत होती, विजा चमकत होत्या न त्यांचे अक्राळ विक्राळ आकार भीतीदायक होते, पण मी पाहत राहिलो ते सगळं! तिथेच शांत उभा राहिलो. ज्या गोष्टीच्या येण्यामुळं एक नवचैतन्य यायचं त्याच गोष्टीमुळं आज ही भीती का या प्रश्नाचं उत्तर शोधत तिथेच उभा होतो.
⚡☄⚡
आज वाऱ्याची मंद झुळूक स्पर्श करून जात नव्हती तर वादळ मला मागे ढकलत होतं. मला स्थिर थांबता येत नव्हतं पण तरी मी उभा होतो... गारा वेचून खाण्यात किती मजा यायची पण आज या पावसात त्या अंगावर प्रहार करत होत्या, ज्यांना खाऊन थंड वाटायचं आज त्याच शेकडो अंगावर दगडासारख्या जखमा देत होत्या...
⚡❄⚡
मी तिथेच उभा होतो, नखशिखांत ते टपोरे थेंब सर्वांगाने गिळंकृत होत होते, कसला तरी दुष्काळ पडलाय आतल्या आत आणि बाहेरून हा इतका पाऊस पडूनही ती तहान भागात नाहीये असं वाटत होतं... झाडांना भिजून उन्हाळ्याची गरमी दूर करणारा हा पाऊस आज त्यांना मुळासकट उन्मळून टाकत होता! ⚡🍂⚡
वळवाचा पाऊस ! हा कितीवेळ कष्ट देणार हे माहित नाही.
पण मी अजूनही उभा आहे, ढगांनी पांघरलेल्या काळोखाआड चंद्रकिरण कुठून तरी वाट काढून हा अंधार दूर करताना मला दिसतंय.
✨🌜✨
चांदण्यांची वाट पाहत, मी अजूनही उभा आहे !

'इंफिरियोरिटी कॉम्प्लेक्स' 'इंफिरियोरिटी कॉम्प्लेक्स' इस संज्ञा से शाब्दिक तौर पर कब पहचान हुई वह कह नहीं सकते। पर प्रासंगिक तौर पर 'इंफिरियोरिटी कॉम्प्लेक्स' याद किया जाये तो . .

Color color which color you want? खेलते वक्त कोई अंग्रेजी इंटरनेशनल स्कुल जाने वाला बच्चा 'लवेंडर कलर!!' चिल्लाता
और फुदकते-दौड़ते कदम फर्श पर मानो जम से जाते। फिर एक दूसरे की ओर खोयी खोयी नजरो से देख खड़े रहते। और वो लमहा मतलब, "Introduction to इंफिरियोरिटी कॉम्प्लेक्स, Chapter 1"

#12am #vishaltalavanekar
#childhood #memories #marathiwriting #hindi
#maharashtra_ig #writersofinstagram

... 🌛🌠🌬
.
.
.
.
.
#ashwinstagram

#Ruaa #marathiwriting #maharashtra_ig
काळ कोणताही असो समाज बदलत नाही. म्हणूनच एक गोपिका राधाला असा सल्ला देतेय. पूर्ण कविता खाली पोस्ट करतेय.

कृष्ण अवखळ अल्लड, जपून जा गं राधे
एका स्त्रीने पुरुषाच्या इतके नसावे मागे... त्याच्या सोळा सहस्त्र सावल्या
तू उन्हाची तिरीप
तो रयतेचा राजा,
तू गर्दीतली एक.... प्रेमाची गं वाट बाई अशी चोखंदळ,
जो चोरी लोणी-तुप, तो त्रिभुवनीचा देव... माणूस म्हणून सये अंतर जरा राख
जो निर्मितो ही सृष्टी तोच करी बेचिराख
रुआ

Most Popular Instagram Hashtags