#marathiarticle

MOST RECENT

पहाटेची वेळ व गार वारा सुटलेला होता. मी खिडकीतून निरभ्र आकाश न्याहाळत होती.
सोबतंच चंद्र, तारे सर्व त्या आसमंतात टिपत बसली होती. अशावेळी तुझी आठवण न येणं म्हणजे भुकेल्या समोर पुरणपोळी ठेवूनही भूक नसल्यासारखी गोष्ट झाली असती. मला तुझ्या विचारांच्या सागरात बुडायला क्षणभरही लागला नाही. काल तू माझ्यासमोर होतास ना तसाच तू मला आता माझ्या डोळ्यासमोर दिसू लागला होता. तेच तुझं हसणं, तेच बोलणं (माझ्यासोबत नाही तरी इतरांसोबत ), तेच तुझं केसांमधून हाथ फिरवून थोडं मिरवणं. सर्वकाही..... डोळ्यासमोर झळकचित्रे स्पष्ट येत होती. कदाचित तुला जाणीव नसेल पण तुझी प्रत्येक सवय ,प्रत्येक अदा माझ्या मनात क्लिक करून ठेवल्या आहेत.
अशा काहीशा विचारांत मी गुंतलेली आणि गार झुळुकेनी मला गोड अशी झोप आली. साहजिकंच ...पापण्या मिटताच मी तुझ्या स्वप्नांत हरवून गेली. पण हा.....स्वप्न माझं म्हणजे त्यात तू माझा.....त्यातही तू मला दुरूनच बघत होता.मात्र नंतर तू माझ्या जवळ आला, स्वप्नातही मला विश्वास बसेना, हे खरं होत पण... त्या विश्वात.
नंतर मात्र सर्वकाही फिल्मी सीन्स सुरू झाले अर्थातच हवेच्या लहरी माझ्या केसांतून भिरभिरू लागल्या व एखाद्या सिनेमा च्या नायिकेप्रमाणे माझे केस उडू लागले, बॅकग्राऊंड मंद म्युझिक वाजू लागलं, माझी नजर मात्र तुझ्या नजरेस भिडली होती ,तू माझा हात आपल्या हातात घेतला तेव्हा सभोवतालच्या परिसरासह माझे गालंही गुलाबी झाले होते. माझी नजर आता खाली झुकली होती.तू काहीतरी बोलणार ...एवढ्यातच...माझी मैत्रीण मला मागून मोठमोठ्याने आवाज देऊ लागली आणि तू......
तू अचानक गायब झालास नंतर पुन्हा ती...मोठ्यांनी "कीर्ती.........." मी एकदम डोळे उघडले व तुझं स्वप्नातही माझ्याशी बोलणं राहून गेलं.
आता मात्र मी तुझं ते बोलणं ऐकण्यासाठी लवकरच निजते.
पण....तू आला नाहीस...... व अजूनही मी त्या माझ्या कल्पनेतल्या तुझी वाट धरून बसलेली आहे. तुझ्या प्रतिक्षेत...... ©अनु_लेख
Like । Comment । Share 😊❤️ #marathi #मराठी #marathiarticle #marathiquotes #marathikavita
#prem

कधी कधी पेपर वाचून असं वाटतं की पेपर वाल्यांना कसं काय ऐवढं लोकांच्या मनातलं कळतं? #doglover #maharashtratimes #marathiarticle #petlovers

😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
#marathiartist
#marathiarticle
#marathiart
#marathiartists
#marathiarti
#

Most Popular Instagram Hashtags